मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात गोंधळाने झाली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी अभूतपूर्व असा गोंधळ घातल्याने आपले भाषण अर्धवट ठेवून राज्यपाल निघून गेले.राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल अशा पध्दतीने आपले भाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे.दरम्यान विरोधी पक्षाने देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यपालांच्या या भाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग ‘नवाब मलिक हाय हाय’च्या घोषणा दिल्या
विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळातआक्रमक झाल्याचं दिसून आलं. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही देण्यात आल्या.