नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात भारतीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि त्यांना मायदेशी सुखरूप परत आणता यावे यासाठी नागरी उडयन मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे स्वतः दाखल झाले आहेत.आतापर्यंत जवळपास अठरा ते वीस विमानांच्या फेऱ्या मधून दोन हजाराच्या घरात विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आले आहे .
विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात येत आहे. युद्ध सुरू असल्यामुळे युक्रेनच्या हद्दीत विमान उड्डाणासही बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोल्दोव्हा आणि बुखारेस्टमार्गे भारतात आणले जाणार आहे.
दरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याठिकाणी जात विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे . केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया बुधवारी युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला पोहोचले. युक्रेनमधून निर्वासन ऑपरेशनच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने चार विशेष दूत नियुक्त केले आहेत, त्यापैकी एक ज्योतिरादित्य सिंधिया आहेत. बुखारेस्टला पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रोमानियातील युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेबाबत विमानतळावरच अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
तसेच विमानतळावर आपल्या वळणाची वाट पाहत उपस्थित भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा केली. बुखारेस्ट विमानतळावर थांबवलेल्या महाराष्ट्रातील काही मेडिकलच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.