December 10, 2022

रशिया युक्रेन युद्धात शंभर पेक्षा अधिक ठार !

रशिया युक्रेन युद्धात शंभर पेक्षा अधिक ठार !

नवी दिल्ली – प्रदीर्घ तणावानंतर रशियाने अखेर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनही रशियाला थेट भिडले आहे. 6 लढाऊ विमाने पाडल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर या युद्धात एका दिवसात 100 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.रशिया आणि युक्रेन मधील तणावाचे पडसाद भारतातील शेयर बाजारावर देखील पाहायला मिळाले.मार्केट तब्बल 2700 अंकांनी कोसळल्याने तब्बल 15 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 10 पेक्षा युक्रेन नागरिक ठार झाले आहेत. दुसरीकडे, युक्रेनने रशियाची 6 लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केलाय. यापाठोपाठ आता अवघ्या काही तासात 100 पेक्षा अधिक बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. 50 रशियन युद्धखोरांना मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर या युद्धात युक्रेनचे 40 सैनिक शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

युक्रेनमधील अनेक गावे रशियन सैन्याच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे. इथे एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोट होत आहेत. दरम्यान, रशियाने बेलारूस सीमेवरूनही हल्ला केला. रशिया आता युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ला करत आहे. दुसरीकडे, नाटोही आता रशियाविरुद्ध प्रत्युत्तराच्या लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष हल्ल्याची कबुली देत ​​असताना, त्यांच्या लष्कराने आतापर्यंत युक्रेनवर हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे.

तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर हल्ल्याची घोषणा केली. रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी ढवळाढवळ केली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, असे धमकीवजा इशाराच त्यांनी अमेरिका आणि नाटो सैन्याना दिला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click