मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापा घातला आहे.मलिक यांना ताब्यात घेण्यात आले.1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी कडून मुंबईत जमीन घेतल्याच्या आरोपावरून मलिक यांची चौकशी सुरू आहे .
नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिम शी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिम चा भाऊ इकबाल कासकर याच्याशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू आहे.दरम्यान मलिक यांनी स्वतःच एक ट्विट करत साथीयो सुना है हमारे घर जल्द ही कुछ सरकारी मेहमान हमारे घर आणेवाले है अस म्हटलं होतं.बुधवारी पहाटे पाच वाजता ईडीने मलिक यांच्या घरावर छापा घातला.