बीड – वाळूच्या धंद्यामुळे चार बालकांचा जीव गेल्यानंतर जर गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे आणि पोलीस जर हद्दीचा वाद घालून हे प्रकरण बीड तहसीलदार अन पोलिसांवर ढकलणार असतील तर पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्हीच लक्ष घाला अन या वाळूमाफियाना पाठीशी घालणाऱ्या खाडे अन तसल्या अधिकाऱ्यांना घरी पाठवा.
गेवराई तालुक्यातील शहजनापूर येथे वाळू उपसा केल्याने झालेल्या खड्यात पाण्यात बुडून चार बालकांचा जीव गेला.ही घटना सायंकाळी आठ वाजता घडली.त्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. जोपर्यंत वाळू माफियांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
दरम्यान ज्या भागात ही घटना घडली तो भाग आपल्या हद्दीत येत नाही म्हणत गेवराई तहसीलदार आणि पोलिसांनी आपली जबाबदारी झटकली.चार बालकांचे जीव गेल्यानंतर जर हद्दीचा वाद घातला जात असेल तर तो अधिकारी खाडे असो की इतर कोणी त्याच्यावर धनुभाऊ तुम्ही कारवाई करणे गरजेचे आहे.
गेवराई तालुक्यात महसूल आणि पोलिसांचा जो नंगानाच सुरू आहे ,त्यामुले सर्वसामान्य माणसाचा जीव जात आहे.अन त्यानंतर देखील जर खाडे सारखे अधिकारी हद्दीचा मुद्दा काढत असतील तर धनुभाऊ यात लक्ष घाला नाहीतर लोकांचे जीव जातील अन अधिकारी मालामाल होतील हे निश्चित .