मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दोन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सोमवारी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
गेल्या 28 दिवसापासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते निमोनिया कोरोना या सारख्या आजारामुळे लतादीदींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते रविवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह देश-विदेशातील गणमान्य व्यक्तींनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली दरम्यान देशात लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले राज्य सरकारने लता दीदींच्या निधनामुळे दुखवटा जाहीर करत सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.