मुंबई – गेल्या पाच सहा दशकापासून भरतवासीयांच्या मनावर आपल्या आवाजाने मोहिनी घालणाऱ्या गाणंकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्या 95 वर्षाच्या होत्या.त्यांच्या निधनाने रसिक प्रेक्षकांवर शोककळा पसरली आहे.
भारतात मराठी,हिंदी सह अनेक भाषांत आपल्या सुरानी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या म्हणून लता मंगेशकर आजही लहान थोर सर्वांना आठवतात.गेल्या काही दिवसापासून लता दिदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.तब्बल 28 दिवस मृत्यशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
लता दीदी यांना न्यूमोनिया, कोरोना झाला होता.पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा मंगेशकर अन लता दीदी म्हणजेच संपूर्ण मंगेशकर कुटुंब हे संगीत क्षेत्रात नावाजलेले होते.आपल्या वडिलांकडून गायकीचे धडे गिरवलेल्या लता दीदी यांचा भारतरत्न पुरस्काराने सरकारने गौरव केला होता.
80 हजारापेक्षा जास्त गीत त्यांनी गायले आहेत.हजारो मराठी ,हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या सुरांनी यावीत गोडी निर्माण केली आहे.मधुबाला ते माधुरी असा पाच सहा पिढ्यांसाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे.त्यांच्या निधनाने भारत वासीयांची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.