October 5, 2022

अभिनेते रमेश देव यांचे निधन !

अभिनेते रमेश देव यांचे निधन !

मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते रमेश देव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्ष होते .त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रमेश देव यांचे सुहासिनी, अपराध, आनंद असे माईलस्टोन सिनेमे ठरले. तसंच लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा ही त्यांची नाटक खूपच चालली. तसंच भावबंधन, उसना नवरा, गहिरे रंग, गुलाम, पैसे झाडाला लागतात, अकुलिना, लालबंगली या नाटकातील भूमिकांचंदेखिल कौतुक झालं. राजा गोसावी, आत्माराम भेंडे यांच्यासह त्यांची अनेक नाटकातून जोडी जुळली. रमेश देव यांचा खलनायक जितका रसिकांना भावला तितकाच भावला आनंद सिनेमामधला डॉ. प्रकाश कुलकर्णी.

तर पडछाया, सोनियाची पावले, देवघर, माझे घर माझी माणसं, ते माझे घर, अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली.

रमेश देव यांनी मराठी सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींसह काम केलं.मात्र त्यांची अप्रतिम जोडी जमली ती सीमा देव यांच्याशी. या दोघांनी अनेक सिनेमांमधून काम केलं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click