August 16, 2022

वाझेसाठी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंचा आग्रह !

वाझेसाठी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंचा आग्रह !

मुंबई – वादग्रस्त अन निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा दबाव होता असा खळबळजनक आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ह्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत .

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी तीन मंत्र्यांचा दबाव होता, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी केली. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तीन मंत्र्यांचा समावेश होता, असं ईडीच्या जबाबामध्ये परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

सेवेत परत का घेतले? त्याची प्रक्रिया काय होती, असा प्रश्न ईडीने परमबीर सिंह यांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, ”एक समिती स्थापन केली होती. निलंबित असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामाची पाहणी करून त्यांना सेवेत घ्यायचे की नाही? याबाबत निर्णय घ्यायचा होता. त्याच यादीत सचिन वाझेचं नाव होतं. बैठक सुरू होती त्यावेळी अनिल देशमुखांचा दबावा होता की सचिन वाझेंना परत सेवेत घ्यावे. तसेच त्यांना मुंबईच्या गुन्हे शाखेत चांगली पोस्टींग द्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दबाव होता”, असे गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले आहेत. 

राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कलेक्शन केले जात असल्याचे सचिन वाझे अन परमवीर सिंग प्रकरणानंतर स्पष्ट झाले होते. वाझे यांनी तर मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी ठेवण्याचे प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click