March 30, 2023

अर्थसंकल्पात नेमकं काय !

अर्थसंकल्पात नेमकं काय !

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर दात्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.डिजिटलायजेशन वर भर देताना अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुविधा देण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे आरबीआय यावर्षी डिजिटल रुपया मार्केट मध्ये आणेल असे सांगताना त्यांनी क्रिप्टो करन्सी वरील उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याचे संकेत दिले आहेत.

सौर ऊर्जा निर्मितीसाठी १९,५०० कोटी
राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींचे पॅकेज
आयकर रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास दिलासा
करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व संपत्ती जप्त
भांडवली खर्च ३५.४ टक्क्यांनी वाढवणार
लष्करात आत्मनिर्भरता
स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत करसवलत
आयकरात कोणताही बदल नाही
कपडे, चमड्याच्या वस्तू स्वस्त होणार
परदेशातून येणारी यंत्रे स्वस्त होणार
मोबाईलसह इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार


पोस्ट ऑफिसमध्येही ऑनलाइन हस्तांतरण शक्य होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येणार आहे. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. 2022 पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे.”, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

आरबीआयचे डिजिटल चलन
चिप असलेले पासपोर्ट
ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण
देशात ६० लाख नव्या नोकऱ्या
पोस्टात कोअर बँकिंग सुविधा
रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य
संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी २५ टक्के बजेट
शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही वाहिन्या
२०२२ मध्ये ५ जी सेवा सुरु करणार
३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी
मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा
क्रिप्टो करन्सी कमाईवर ३० टक्के कर

यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात चिप्स असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रे ई-पासपोर्टसाठी अपग्रेड केली जातील आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित पासपोर्ट सेवा प्रदान करण्यासाठी वाटप केलं जाईल.

जमिनीची कागदपत्रं डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन दिले जातील. तसंच जागांचं रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे कार्यालयात न जाता कुठूनही करता येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजिटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे.सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

2022 मध्ये 5G सेवा सुरू केली जाईल आणि गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. दूरसंचार क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी शोधल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click