October 2, 2022

क्रिप्टो करन्सी वर 30 टक्के कर !

क्रिप्टो करन्सी वर 30 टक्के कर !

नवी दिल्ली – आभासी चलन अर्थात क्रिप्टो करन्सी बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.यापुढे क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्न वर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.त्यासोबत आता आरबीआय देखील डिजिटल रुपया मार्केटमध्ये आणणार आहे.

निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेमुळे आभासी चलनांना मान्यता मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आरबीआयकडून डिजिटल रुपया येणार आहे’, अशी घाेषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच क्रिप्‍टोकरन्सीच्‍या उत्‍पन्‍नावर ३० टक्‍के कर लागणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

‘गावागावांत ब्राॅडबॅण्ड सुविधा उभी करणार आहे. त्याचबरोबर लवकरच 5G ची सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एटीएमची सुविधा देण्यात येणार आहे. आणि पासपोर्टमध्ये ई-चीप बसविण्यात येणार आहे. 5G योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे’, असेही अर्थमंत्री म्‍हणाल्‍या.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ निर्मला सीतारामन यांनी संसदेत वाचण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल मत व्यक्त वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की, ‘शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजिटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. ‘, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत दिली.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. ‘कोरोना जास्त प्रभाव आपल्या देशावर पडलेला आहे. त्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळुहळु सावरत आहे. देशाचा जीडीपी ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधेतून गुंतवणूक करणार आहे’, असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click