नवी दिल्ली – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.बीसीसीआयचे चेअरमन सौरव गांगुली आणि विराट यांच्यातील कथित वादाची किनार या राजीनाम्यामागे असल्याची चर्चा आहे.आता वन डे सह टी ट्वेन्टी आणि कसोटी तिन्ही संघाच्या कर्णधारपदी कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच्या या निर्णयामुळे त्याने वनडेचे कर्णधारपद गमावले. किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत होते. पण अखेर त्याने अचानकपणे कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.