नवी दिल्ली- उत्तरप्रदेश, पंजाब,गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली.14 जानेवारी पासून सुरू होणारा निवडणूक प्रक्रियेचा आखाडा 7 मार्चला संपेल,सर्व पाचही राज्यात मतमोजणी ही 10 मार्च रोजी होईल .देशातील ही पहिली निवडणूक असेल ज्यात सार्वजनिक सभा,संमेलन,रॅली,रोड शो वर बंदी घालण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेश ,गोवा ,उत्तराखंड या तीन राज्यात भाजपची सत्ता आहे तर पंजाब आणि मणिपूर मध्ये काँग्रेस ची सत्ता आहे.देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
उत्तरप्रदेश या एकमेव राज्यात सात टप्यात मतदान होईल,तर मणिपूर मध्ये दोन टप्यात आणि उर्वरित राज्यात एकाच टप्यात मतदान होईल.कोरोना पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मतदानासाठी एक तासांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज हा ऑनलाइन सुद्धा भरू शकणार आहेत.
या पाच राज्यात 14 जानेवारी पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.प्रचार करताना पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची काळजी घेण्याची आवाहन आयोगाने केले आहे.सर्व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 10 मार्च रोजी मतमोजणी होईल अशी माहिती आयुक्त चंद्रा यांनी दिली आहे.