July 6, 2022

माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !

माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील या दोघांविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या आरोपपत्रात देशमुख यांचे नाव 100 कोटीच्या वसुली प्रकरणात मुख्य आरोपी म्हणूंन नाव आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई पीएमएलए कोर्टात आरोपपत्र सादर केले. आरोपपत्र 6000 पानांचे असून आरोपपत्रात देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. या खटल्यात देशमुख यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून असून त्यांची मुले हृषिकेश आणि सलील यांचीही आरोपी म्हणून नावे आहेत.

अनिल देशमुख हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत तपास यंत्रणांच्या समोर आले नव्हते. 2 नोव्हेंबरला ते अचानक ईडीसमोर आले. ईडीने त्यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी केली आणि त्यांना अटक केली. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून खंडणी गोळा करून बडतर्फ सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेने अनिल देशमुखाना 4.7 कोटी रुपये दिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळले. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेचा जबाब दोनदा नोंदवला. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआय एफआयआरनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सचिन वाझे आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईत खंडणी म्हणून महिन्याला 100 कोटी रुपये उकळण्यास सांगितले होते हा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. हा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. सचिन वाझे आणि इतर काही अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांनी दर महिन्याला बार आणि रेस्तराँ यामधून शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असं परमबीर यांनी म्हटलं होतं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click