September 30, 2022

बैलगाडी शर्यतीसाठी नवे नियम !

बैलगाडी शर्यतीसाठी नवे नियम !

मुंबई – राज्यातील बैलगाडा शर्यतील सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने याबाबत काही सूचना केल्या आहेत.शर्यत कोठे असावी,बैलांना मारहाण करू नये,आयोजकांनी काय काय नियम पाळावेत याबाबत कडक अंमलबजावणी करावी अन याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे असे सूचित करण्यात आले आहे.

1000 मीटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसेल अशा योग्य धावपट्टीवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येईल, बैलगाडी शर्यतीची धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खड़क असलेली, चिखल, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेले ठिकाण असलेली नसावी. बेलगाडी शर्यंत रस्त्यावर किंवा महामागांवर आयोजित करण्यात येऊ नये.

बैलांना किंवा वळूंना एखाद्या विशिष्ट शर्यतीसाठी किमान 30 मिनिटे आराम द्यावा आणि कोणत्याही वळूचा किंवा बैलाचा वापर एका दिवसामध्ये तीनपेक्षा अधिक शयंतीसाठी करण्यात येऊ नये, धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान 20 मिनिटे आराम द्यावा

केवळ एका गाडीवानास बैलगाडी चालविण्यास परवानगी असेल, आणि अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बेलगाडी भोवती चालविता येणार नाही; (घ) कोणताही गाडीवान किंवा बैलाच्या शर्यतीचा प्रस्ताव देणारी व्यक्ती, तिच्याकडे किंवा गाडीवर कोणतीही काठी, चाबूक, पिंजरी किंवा बैलास दुखापत करू शकेल किंवा बैलास बीजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही.

पाय बांधणे किंवा बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबुक अथवा पिंजरी यासारखे कोणतेही साधन अथवा विद्युत धक्का किंवा अन्य साधनांचा वापरणे अथवा जननअंग पिळणे अथवा जनन अंगावर लाथ मारणे अथवा आरुने जनन अंगास इजा पोचवणे अथवा शेपूट पिरघळणे अथवा शेपटीस चावा घेणे यास गाडीवानास प्रतिबंध असेल

शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या अथवा वळूच्या जोड्या या, एकमेकांशी योग्यरीत्या सुसंगत असाव्यात. बैलगाडी शर्यतीकरिता वळू अथवा बेलांना कोणत्याही प्रकारच्या प्राण्या सोबत जुंपण्यात येणार नाही , वळू अथवा बैलासाठी असलेल्या आरामाच्या जागेत पुरेसी सावली/निवारा, पुरेसे खाद्य, चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. आरामाची जागा नीटनेटकी, स्वच्छ व आरोग्यदायी असावी;

आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्याला कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याचा प्रभार असणाऱ्या व्यक्तीकडून बैलगाडी शर्यती पूर्वी किंवा दरम्यान कोणत्याही साधनांद्वारे कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही,आयोजक, बैलांना किंवा वळूना शर्यती आगोदर किंवा त्यादरम्यान कोणतीही उत्तेजक औषधिद्रव्ये, अल्कोहल, क्षोभक इत्यादी दिली जात नसल्याची खात्री करील :

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click