December 6, 2022

फास्ट ट्रेनला घाटनांदूर थांबा देण्याची खा मुंडेंची मागणी !

फास्ट ट्रेनला घाटनांदूर थांबा देण्याची खा मुंडेंची मागणी !

बीड –
परळी तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांना थांबा देण्यात यावा या मागणीसाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची दिल्ली येथे भेट घेतली.तसेच याभेटीत त्यांनी नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाविषयी चर्चा करून जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या सोडवण्याची मागणी केली.

घाटनांदूर रेल्वेस्थानक हे प्रवासी आणि व्यापारी दृष्ट्या अतिशय सोयीचे असल्याने या मार्गाहून जाणाऱ्या जलदगती गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे.जलद रेल्वे गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा मिळाला तर या भागातील प्रवासी नागरीक आणि व्यावसायिक कामांनिमित्त हैद्राबाद येथे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

नांदेड-बंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा या मागणीचे निवेदन खा.प्रितमताई मुंडे यांनी सुनीत शर्मा यांना दिले.घाटनांदूर रेल्वे स्थानकावर या जलद गाड्यांना थांबा मिळाला तर प्रवासी,व्यापाऱ्यांसह दक्षिण भारतात देवदर्शन आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय होणार असल्याने खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या मागणीसाठी प्रवासी नागरीकांमधून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

रेल्वेपूलांच्या रस्त्यांसंदर्भात सूचना देण्याची मागणी

जिल्ह्यातील रेल्वेमार्गावर असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्तेबांधणीच्या कामात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत,या त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे.यासंदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर संबंधिताना सूचना केल्या आहेत.रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात,जेणेकरून नागरीकांना उद्भवनाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल व समस्यांचे निराकरण होईल असेही खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वेबोर्डाच्या अध्यक्षांना सूचित केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click