December 10, 2022

एसटी कर्मचाऱ्यांना नवी वेतनवाढ !

एसटी कर्मचाऱ्यांना नवी वेतनवाढ !

मुंबई – गेल्या महिना भरापासून सुरू असलेल्या एस टी च्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही.मात्र तरीही एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना नवी वेतनवाढ लागू केली आहे.नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळणार आहे,जे कर्मचारी अद्याप संपावर आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी तब्बल महिना भरापासून एसटी चे हजारो कर्मचारी संपावर आहेत.सरकारने अनेक वेळा संपकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तोडगा निघू शकलेला नाही.दरम्यान आता महामंडळाने यावर तोडगा काढला आहे.

महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि 10 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. 10 ते 20 वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना 4000 रुपयांची पगारवाढ, तसेच 20 वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. 28 टक्के महागाई भत्ताही देण्यात येणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप सुरूच आहे. महामंडळात बुधवारी 92 हजार 266 पैकी फक्त 18 हजार 694 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने सुधारित वेतनवाढीची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एक परिपत्रकच काढले आहे.

जे कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत, त्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली आहे. बुधवारी 448 कर्मचारी निलंबित केले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजार 643 झाली आहे. तसेच रोजंदारीवरील 65 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली. आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click