मुंबई – उद्यापासून म्हणजे 1 डिसेंबर 2021 पासून होम लोन,एलपीजी सिलेंडर,क्रेडिट कार्ड, आधार नंबर यासह काही महत्वपूर्ण बदल होणार आहेत. ज्यांचा सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होणार आहेत.
बँक,एलपीजी,आधार यामध्ये उद्यापासून काही नवे बदल होणार आहेत.जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असेल, तर तो 30 नोव्हेंबरपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक करा. 1 डिसेंबर 2021 पासून, कंपन्यांना फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ECR (इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न) दाखल करण्यास सांगितले आहे ज्यांचे UAN आणि आधार लिंकिंग सत्यापित झाले आहे. जे कर्मचारी उद्यापर्यंत ही लिंक दाखल करू शकणार नाहीत ते ECR देखील दाखल करू शकणार नाहीत.
सणासुदीच्या काळात, बहुतेक बँकांनी गृहकर्जाच्या विविध ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. बहुतांश बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर रोजी संपत आहेत परंतु LIC हाउसिंग फायनान्सची ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंतच संपत आहे.
तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI च्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग होणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जारी केले जातात. त्यामुळे याचे नवीन दर 1 डिसेंबरला सकाळी जाहीर केले जातील.
जर तुम्ही देखील पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर ते लगेच करा. पेन्शनधारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा १ डिसेंबरपासून तुम्हाला पेन्शन मिळणे बंद होईल