बीड- 2021 या वर्षातील शेवटचे खंडग्रास ग्रहण हे शुक्रवारी होणार असून तब्बल पाच तास 59 मिनिटे इतका मोठा कालावधी या ग्राहणाचा असणार आहे.भारतात हे ग्रहण अरुणाचल प्रदेश वगळता इतरत्र दिसण्याची शक्यता नाहीये .त्यामुळे भारतवासीयांनी काळजी करण्याची गरज नाहीये.
वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या तारखेला होते. अशा स्थितीत यावेळी कार्तिक शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजेच १९ नोव्हेंबर असेल.भारतीय वेळेनुसार, ग्रहण सकाळी 11:34 वाजता सुरू होईल, जे संध्याकाळी 05:33 वाजता संपेल. अशा स्थितीत हे ग्रहण दीर्घकाळ टिकेल. ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 05 तास 59 मिनिटे असेल.
वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण युरोप, अमेरिका, पश्चिम आफ्रिका, इंडोनेशिया, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर हे ग्रहण अरुणाचल प्रदेशच्या काही भागात संध्याकाळी दिसणार आहे.
ग्रहण ही ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी वृषभ रास आणि कृतिका नक्षत्रात होणार आहे.भारतात हे ग्रहण खंडछाया चंद्रग्रहण असेल. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. हे ग्रहण भारतात न दिसल्याने त्याचा लोकांच्या जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही.
ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टीकोनातून, जेव्हा ग्रहण फक्त एक उपांत्य ग्रहण असते, तेव्हा सुतक कालावधी प्रभावी नाही. चंद्रग्रहणात सुतक कालावधी ग्रहणाच्या पाच तास आधी सुरू होतो.वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण वृषभ आणि कृतिका नक्षत्रात होणार आहे. काही राशींसाठी चंद्रग्रहण चांगले आहे तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण तुळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी सामान्य फळ देईल.
करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. यश मिळण्याची शक्यता आताच्या तुलनेत अधिक वाढेल. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. अडथळे कमी होतील. धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, ग्रहणामुळे मेष, वृषभ, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल.