लंडन – सेक्स इंडस्ट्रीत काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी स्पेशल कोर्स ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ब्रिटन मधील विद्यापीठाने हा कोर्स सुरू केला आहे,मात्र त्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
डरहॅम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्स युनियनने सर्व विद्यार्थ्यांना तसेच स्टाफला सेक्स इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संधी असल्याचे मेल पाठवले आहेत. डरहॅम स्टुडंट्स युनियनने हा कोर्स बनवला आहे. ग्रॅज्यूएट्स विद्यार्थ्यांनी वेश्या व्यवसायात प्रवेश करुन मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन कंटेट तयार करण्याचं प्रमाण वाढल्याकारणाने हा कोर्स आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये सेक्स इंडस्ट्रीमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन देण्यासाठी धडे दिले जाणार आहेत. “विद्यार्थी सुरक्षित राहतील आणि अभ्यासपूर्ण निवडी करू शकतील याची खात्री करण्यासाठी” म्हणून हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सेक्स इंडस्ट्रीमध्ये सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलाकडे पाहता हा कोर्स महत्त्वाचा होता, असं विभागाचं म्हणणं आहे.
मात्र, दुसरीकडे ब्रिटनचे विद्यापीठ राज्यमंत्री मिशेल डोनेलन यांनी विद्यापीठाच्या या निर्णयावर टीका केली आहे. “धोकादायक उद्योगाला अशी कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल” आणि “त्यांच्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याच्या कर्तव्याचे घोर उल्लंघन” केल्याबद्दल त्यांनी ही टीका केली आहे.
असं करणारं कोणतंही विद्यापीठ विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या कर्तव्यात गंभीरपणे अपयशी ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले की, शोषित महिलांना पाठिंबा देणे योग्य आहे. मात्र, हा अभ्यासक्रम सेक्स विक्रीला सामान्य करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याला आमच्या विद्यापीठांमध्ये स्थान नाही.” डरहॅम युनिव्हर्सिटी आणि स्टुडंट्स युनियनला विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. ज्यात म्हटलंय की विद्यार्थी आणि कर्मचार्यांसाठी कोर्सची जाहिरात कॅम्पसमध्ये वेश्याव्यवसाय उपलब्ध असल्याप्रमाणेच लक्ष वेधत आहे.