February 2, 2023

बैलगाडा शर्यतीसाठी शासन कटिबद्ध – मंत्री केदार !

बैलगाडा शर्यतीसाठी शासन कटिबद्ध – मंत्री केदार !


नवी दिल्ली – बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळयाचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली.

बैलगाडा शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता ऍड शेखर नाफडे, ऍड मुकुल रोहतगी आणि राज्य शासनाचे वकील ऍड सचिन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी मा ना श्री सुनील केदार आज दिल्ली येथे उपस्थित होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली. वरिष्ठ अधिवक्ता यांचेशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, पशुसंवर्धन आयुक्त एस पी सिंह सहभागी झाले होते.

राज्यात बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू होण्याबाबत एप्रिल 2017 मध्ये कायदा संमत केला होता. परंतू त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे शासनाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून पुढील आठवडयात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होईल. यासाठीच महाराष्ट्र शासनाच्यावतीने अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आले असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.


देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडयांच्या शर्यती होत असतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगीतीमुळे केवळ महाराष्ट्रात शर्यतींना बंदी आणण्यात आलेली आहे. ही बंदी उठवावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून ही याचिका विस्तारित खंडपीठाकडे सुनावणीसाठी 3-4 वर्षांपासून प्रलंबित आहे.


राज्यशासन यामध्ये सातत्याने पाठपूरावा करीत असून यावर अंतरीम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दयावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरीष्ठ अधिवक्ता म्हणुन ऍड मुकूल रोहतगी, ऍड शेखर नाफडे आणि ऍड सचिन पाटील हे प्रकरण हाताळत आहेत.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतची 400 वर्षांची पंरपरा आहे. बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात त्यांचे संगोपन करतात. खिल्लार ही महाराष्ट्रातील बैलांची नामांकित स्थानिक जात आहे. या जातीचे बैल चपळ असल्याने केवळ शर्यतीसाठी प्रसिद्ध आहेत. खिल्लार गाय दूधासाठी प्रसिद्ध नसून शर्यतीत वापरले जाणाऱ्या खोंडासाठी प्रसिद्ध आहे. शर्यती बंद असल्यामुळे खिल्लारच्या खोडांना मागणी बंद झाली, तसेच शर्यती बंद असल्यामुळे ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावांच्या जत्रा भरत नाहीत. बैलगाडा शर्यत हा शेतक-यांच्या जीवनातील सांस्कृतिक व पारंपरिक भाग म्हणुन पाहण्यात यावे, अशी मागणीही बैलगाडा संघटनेकडून असल्याचेही श्री केदार यांनी यावेळी सांगितले.


पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी श्री रामकृष्ण टाकळकर, श्री संदीप बोदगे हे ही याप्रकारणाच्या पाठपूराव्यासाठी राजधानी दिल्ली येथे उपस्थित आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click