टोकियो – तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने ऑलम्पिक मध्ये पदक मिळवुन तमाम क्रीडा रसिकांचे स्वप्न साकार केले .भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिकमध्ये हॉकीत मेडल मिळवले आहे.
या मॅचमध्ये जर्मनीनं आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीच्या ऊरजनं फिल्ड गोल करत 1-0 नं आघाडी मिळवली. भारताला 5 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रुपिंदर पाल सिंह गोल करण्यात अपयशी ठरला. दोन्ही टीम सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत होत्या. सातव्या मिनिटाला जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न गोलकिपर श्रीजेशनं उधळला.
भारतीय टीमनं 2 गोलच्या पिछाडीनंतरही जिद्द सोडली नाही. हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी 2-3 नं कमी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटात दोन गोल करत बरोबरी साधली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने जोरदार सुरुवात केली. भारताकडून 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये पहिल्यांदाच टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 5 मिनिटांनीच सिमरनजीत सिंहनं गोल करत 5-3 अशी आघाडी घेतली.