नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये तब्बल तासभारपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली .या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या भेटीपूर्वी पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांची भेट घेतली होती .त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आले आहे .
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच शरद पवार हे मोदींच्या भेटीला गेले होते .या दोघांमध्ये तब्बल तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली,स्वतः मोदी यांनी या भेटीचे छायाचित्र ट्विटर वर शेयर केले आहे .
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे लागलेला ईडी चा ससेमिरा,तसेच केंद्र सरकारने निर्माण केलेले नवे सहकार मंत्रालय या आणि इतर बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .
मोदी यांच्या भेटी अगोदर पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची देखील चर्चा झाली .शरद पवार हे अचानक मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे .