August 20, 2022

खडसेंच्या जावयाला ईडी कडून अटक !

खडसेंच्या जावयाला ईडी कडून अटक !

मुंबई – भाजपचे माजीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे .भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे.

भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते.

यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.

गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचे आज सकाळी जाहीर केले. यामुळे आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असे नंतर समोर आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click