चंदिगढ – ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे ९१व्या वर्षी निधन झाले आहे. मिल्खा सिंग यांच्या जाण्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त करत मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केलं होतं.