दिल्ली – फाफ दुप्लेसी,अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात 219 धावांचे टार्गेट ठेवले,हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकोक यांनी चांगली सुरवात करून दिली,त्यानंतर कायरण पोलार्ड ने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि सहजपणे मुंबई ने सामना जिंकला .
मुंबई आणि चेन्नई च्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला .ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाल्यानंतर मोईन अली आणि दुप्लेसी यांनी चांगली फलंदाजी करत चेन्नई ला सन्मानजनक सुरवात करून दिली,त्यानंतर आलेल्या अंबाती रायडू ने देखील आपलं अर्धशतक झळकावत चेन्नई चा स्कोर 218 पर्यंत नेऊन ठेवला .
मोठं टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबईची सुरवात चांगली झाली,रोहित शर्मा ने 35 तर डिकोक ने 38 धावा केल्या,त्यानंतर आलेल्या पोलार्ड ने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक केले .त्याच्या फटकेबाजीमुळे मुंबई ने हा सामना जिंकला .