मुंबई – पंजाब ने दिलेले अवघ 124 धावांचे टार्गेट पूर्ण करताना सुरवातीला बसलेले धक्के पचवत कोलकाता ने सहज विजय मिळवत सलग पराभवाचा दुष्काळ संपवला .
पंजाब कडून मयांक अग्रवाल आणि ख्रिस जॉर्डन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किमान शंभर पेक्षा जास्त धावा केल्या .दुसरीकडे कोलकाता च्या संघाला पाहिल्याचं षटकात नितेश राणा च्या रूपाने पहिला धक्का बसला,दुसऱ्या षटकात दुसरा तर तिसऱ्या षटकात तिसरा धक्का बसला.
मात्र त्यानंतर आलेल्या कप्तान मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी जोरदार फलंदाजी करत कोलकाता ला विजया समीप पोहचवल .राहुल त्रिपाठी ने 41 तर मॉर्गन ने देखील 47 धावा केल्या .कोलकाता ने हा सामना 5 गडी राखून जिंकला .