चेन्नई – शेवटच्या षटकात पाच षटकार अन एका चौकारासह तब्बल 37 धावा काढल्यानंतर गोलंदाजी अन फिल्डिंग मध्ये कमाल करणाऱ्या रवींद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे चेन्नई ने आरसीबी चा 69 धावांनि पराभव केला .विराट चा संघ पटण्यासारखा कोसळला .दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि हैद्राबाद मध्ये सुपर ओव्हर पर्यंत गेलेला सामना हैद्राबादने दिलेले टार्गेट पूर्ण करत दिल्लीने रोमांचक विजय मिळवला .
चेन्नई ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आरसीबी समोर 192 धावांचे टार्गेट ठेवले होते .चेन्नई कडून ऋतुराज गायकवाड, फाफ दुप्लेसी यांनी चांगली सुरवात केली मात्र नंतर कोणीही टिकू शकले नाहीत,चेन्नई 150 चा टप्पा पार करेल की नाही अस वाटत असताना रवींद्र जडेजा नावाचं वादळ आलं अन आरसीबी ची हवा काढून घेतली .
जडेजा ने हर्षल पटेल च्या शेवटच्या षटकात तब्बल पाच षटकार आणि एका चौकारासह 37 धावा घेतल्या .आरसीबी कडून देवदत्त पडीकल शिवाय कोणीही मोठी धावसंख्या करू शकल नाही,तब्बल 69 धावांनी चेन्नई ने हा सामना जिंकला .
दुसऱ्या सामन्यात दिल्ली ने ठेवलेले 160 धावांचे टार्गेट पूर्ण करताना हैद्राबाद ची पुन्हा एकदा दमछाक झाली .दिल्लीकडून पृथ्वी शॉ, ऋषभ पंत यांनी केलेल्या खेळीमुळे सन्मानजनक स्कोर उभा करता आला.
160 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या हैद्राबाद ला सुरवातीला दोन धक्के बसले .केन विल्यम्सन ने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे सामना रंगात आला होता,पण शेवटी दिल्ली आणि हैद्राबाद यांचे स्कोर लेव्हल झाल्याने हैद्राबाद ने प्रथम फलंदाजी करत एका षटकात 7 धावा केल्या या धावा सहज करत दिल्ली ने हा सामना जिंकला .