चेन्नई – शिवम दुबे आणि राहुल तेवतीया यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स ने वीस षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या अन एक सन्मानजनक स्कोर उभा केला .सुरवातीला अडखळत सुरवात झालेल्या राजस्थान ने शेवटी शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे 177 पर्यंत मजल मारू शकले .आरसीबी च्या विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांच्या सलामीच्या जोरदार फटकेबाजीने हा विजय सहज मिळवला .
177 धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या आरसीबीच्या देवदत्त ने षटकार अन चौकरांची बरसात करत सहजपणे टार्गेट कडे कूच केली तर त्याला कप्तान विराट ने देखील अर्धशतक करत मोठी साथ दिली .मागच्या सिझन मध्ये सुद्धा आपल्या फलंदाजीमुळे लक्षात राहिलेल्या देवदत्त ने या सामन्यात देखील लक्ष वेधून घेतले .
देवदत्त पडीकल च्या शतकामुळे आरसीबी ने हा सामना दहा गडी राखून सहजपणे जिंकला .