मुंबई -पंजाब ने दिलेले अवघे 120 धावांचे टार्गेट केवळ एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत सनरायझर्स हैद्राबाद ने आयपीएल2021 मधील आपला पहिला विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या संघाने 20 षटकात 220 धावा केल्या,या धावांचा पाठलाग करताना कोलकाता च्या संघाने 203 इतक्या धावा केल्याने पराभव पत्करावा लागला .कोलकाता कडून आंद्रे रसेल,दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्स यांच्या फटकेबाजीमुळे रोमांचक स्थिती निर्माण झाली होती .
बुधवारी हैदराबाद आणि पंजाब तसेच चेन्नई आणि कोलकाता असे दोन सामने झाले .दुपारी झालेल्या हैदराबाद विरुद्ध पंजाब च्या सामन्यात केवळ 120 धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या हैद्राबाद संघाने एका विकेटच्या मोबदल्यात हे टार्गेट पूर्ण करत आपला पहिला विजय मिळवला .हैद्राबाद कडून जॉनी बेईस्तो ने अर्धशतकी खेळी केली .
दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ दुप्लेसी या दोघांनी केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे चेन्नई ने 220 धावांचा डोंगर उभा केला .गायकवाड ने 64 तर दुप्लेसी ने 95 धावा केल्या .कोलकाता संघाकडून दिनेश कार्तिक,आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांनी शानदार फलंदाजी केली मात्र पराभव वाचवू शकले नाहीत .