मुंबई – राजस्थान समोर ठेवलेले 189 धावांचे टार्गेट पूर्ण करताना संजू सॅमसन सहित सर्वच फलंदाजांनी हारकिरी केल्याने चेन्नई ने धमाकेदार विजय मिळवत राजस्थान चा मोठा पराभव केला .चेन्नई कडून खेळताना फाफ दुप्लेसी आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी थोड्या थोड्या धावा करत 189 धावांचे टार्गेट दिले जे पूर्ण करताना राजस्थान ची दमछाक झाली .
राजस्थान ने टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरल्यावर चांगली सुरवात केली मात्र चेन्नई ने टिच्चून मारा करत राजस्थानचा डाव दिडशे च्या आत आटोपत मोठा विजय मिळवला .चेन्नई कडून सुरेश रैना,रवींद्र जडेजा,महेंद्रसिंग धोनी,फाफ दुप्लेसी या सर्वांनी थोड्या थोड्या धावा करत 189चे टार्गेट दिले .
राजस्थान कडून जोस बटलर ने 49 धावा केल्या ,दुसरा कोणताही फलंदाज जास्त धावा करू शकला नाही .चेन्नई कडून मोईन अली आणि ,सॅम करणं यांनी प्रत्येकी 3 आणि 2 बळी घेतले आणि विजय मिळवून दिला .