चेन्नई – क्विंटन डिकॉक ,रोहित शर्मा आणि कायरण पोलार्ड यांच्या खेळीमुळे मुंबई च्या टीमने हैद्राबाद समोर ठेवलेलं 151 धावांचे लक्ष्य हैद्राबाद सहजपणे पार करता न आल्याने मुंबई ने विजय मिळवला .मुंबई ने लो स्कोर केल्याने मॅचमध्ये रंगत आली होती मात्र अखेर हैद्राबाद आपल्या पहिल्या विजयापासून दूर राहिला .
मुंबईच्या डावाची सुरवात चाचपडत झाली,मात्र एकीकडून क्विंटन डीकॉक ने टिच्चून फलंदाजी केली,त्याला रोहित शर्मा ने चांगली साथ दिली,ही जोडी फुटल्यावर मुंबईला एकामागोमाग एक धक्के बसले .मात्र नंतर आलेल्या पोलार्ड ने झटपट तिसपेक्षा अधिक धावा केल्याने मुंबई ला 150 धावा करता आल्या .
हैदराबाद चा संघ अवघ्या 150 धावा सुद्धा करू शकला नाही .हैद्राबाद कडून विजय शंकर आणि डेव्हिड वोर्नर या दोघांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही .