मुंबई – दिल्लीचा कप्तान ऋषभ पंत च्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला केवळ 148 धावांचे टार्गेट देणाऱ्या दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने अवघ्या 56 धावांवर राजस्थानचा अर्धा संघ तंबूत परतला .दरम्यान डेव्हिड मिलर ने एकतर्फी किल्ला लढवत सामन्यात रंगत आणली .त्याला राहुल तेवतीया ने साथ दिली .या सामन्यात राजस्थान ने हा सामना 3 विकेट राखून जिंकला .
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली .संजू सॅमसन चा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत दिल्लीला केवळ 147 धावांवर रोखण्यात यश मिळवले .दिल्लीकडून कप्तान ऋषभ पंत वगळता कोणीही फलंदाज चांगला स्कोर करू शकला नाही .ऋषभ 51 धावांवर बाद झाला अन फलंदाजी साठी उतरलेल्या राजस्थान ला एका पाठोपाठ एक धक्के बसू लागले .
राजस्थान चा अर्धा संघ 56 धावात तंबूत परतला होता .डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांच्यामुळे राजस्थान ने हा सामना शेवटच्या दोन बॉल आणि तीन विकेट राखून सामना जिंकला .