मुंबई – शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब च्या सामन्यात अखेर राजस्थान ने 222 धावांचा पाठलाग केला मात्र पंजाब ने अखेर विजय मिळवला .के एल राहुल,ख्रिस गेलं, अन दीपक हुडा यांच्या धमाकेदार खेळीमुळे आयपीएल च्या चौथ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब ने राजस्थान रॉयल्स समोर तब्बल 221 धावांचा डोंगर उभा केला,एवढ्या मोठ्या टार्गेट चा पाठलाग करताना राजस्थान ची सुरवात खराब झाली,मोहम्मद शमी ने बेन स्टोक्स ला शून्यावर बाद केले अन या धक्यातून शेवटपर्यंत राजस्थान चा संघ सावरेल का नाही अस वाटत असताना संजू सॅमसंन ने केलेल्या शतकी खेळीमुळे देखील राजस्थान ला विजय मिळवता आला नाही .
राजस्थान आणि पंजाब दरम्यान झालेल्या चौथ्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी राजस्थान ची गोलंदाजी अक्षरशः कुटून काढली,ख्रिस गेलं नावाचं वादळ मैदानात उतरल अन पंजाब ने धावा लुटायला सुरुवात केली, गेलं नंतर सर्व सूत्र हातात घेत कप्तान के एल राहुल ने 91 धावा करत मोठी धावसंख्या उभारली,त्याला दीपक हुडा यांनी तेवढीच मोलाची साथ दिली .
या सामन्यात षटकार अन चौकरांचा अक्षरशः पाऊस पडला .वीस षटकात पंजाब ने तब्बल 221 धावा केल्या .हे टार्गेट घेऊन उतरलेल्या राजस्थानची सुरवात खराब झाली .मात्र कप्तान संजू सॅमसन याच्या नाबाद शतकी खेळी करूनही राजस्थान ने एवढं मोठं टार्गेट पार करता आले नाही .संजू ने आपल्या शतकी खेळीत बारा चौकार आणि आठ षटकार ठोकले .