चेन्नई – आयपीएल च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता ने दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना हैद्राबाद चा डाव लवकर संपुष्टात आल्याने केकेआर ने मोठा विजय मिळवला .नितीश राणा च्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीमुळे केकेआर ला मोठी धावसंख्या उभारता आली .
चेन्नई च्या मैदानावर झालेल्या आयपीएल च्या तिसऱ्या सामन्यात हैद्राबाद आणि केकेआर ने एकमेकांना जोरदार लढत दिली .केकेअर कडून खेळताना नितीश राणा ने केलेल्या 80 धावांमुळे कोलकाता ने 187 धावा करत हैद्राबाद ला मोठे टार्गेट दिले .
गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या केकेआर ने सुरवातीला हैद्राबाद ला दोन धक्के दिले,यातून मनीष पांडे ने अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी 177 धावांवर हैद्राबाद चा डाव संपुष्टात आला आणि केकेआर ने दहा धावांनि विजय मिळवला .