मुंबई – नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेऊन मैदानात उतरलेल्या आणि चेन्नई च्या 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल ने जोरदार अन धमाकेदार फलंदाजी करत चेन्नई वर सहज विजय मिळवला अन आयपीएल मधील पहिला विजय नोंदवला .शिखर धवनच्या 85 धावा आणि त्याला पृथ्वी शॉ ची साथ यामुळे वीस षटकाच्या आत हा विजय प्राप्त केला .
आयपीएल मधील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडेवर सुरू झाला,ऋषभ पंत ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले,चेन्नई ला 63 धावात तीन धक्के दिल्यावर सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि नंतर आलेल्या सॅम करणं ,रविंद जडेजाने केलेल्या छोट्या पण महत्वपूर्ण खेळीमुळे 20 षटकात 188 धावा केल्या .
हे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामी शिखर अन पृथ्वी या जोडीने शतकी भागीदारी करत विजय निश्चित केला,पृथ्वी च्या नंतर 85 धावा वर असताना शिखर आउट झाला पण तोपर्यंत दिल्लीच टार्गेट जवळपास आलं होतं,दीड ओव्हर शिल्लक असताना दिल्लीने आपला पहिला विजय प्राप्त केला .