मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सचिनने ट्विट करत दिली आहे,विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात सचिनने किमान 277 वेळा अँटिजेंन किंवा आर्टिपीसीआर टेस्ट करून घेतलेली आहे .नुकत्याच झालेल्या इंडिया लिजेन्ड्स चे नेतृत्व त्याने केले होते .
“मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सर्व काळजी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. माझ्या घरच्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे व डॉक्टरांनी सांगितलेली सर्व काळजी घेत आहे. मला मदत करणाऱ्या सर्व मेडिकल स्टाफचे मी आभार मानत आहे. सर्वांनी काळजी घ्या,” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
२०१३ साली क्रिकेटला अलविदा केलेल्या सचिनने भारताकडून २०० कसोटी, ४६३ वनडे व एक कसोटी सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर तब्बल १०० शतकं असून सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सचिनने वनडे व कसोटीत अनुक्रमे १८४२६ व १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनला सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वात महान फलंदाज समजले जाते.