August 20, 2022

उद्या रात्री बारानंतर दहा दिवस लॉक डाऊन !बाहेरगावी जाताना,येताना टेस्ट बंधनकारक !!

उद्या रात्री बारानंतर दहा दिवस लॉक डाऊन !बाहेरगावी जाताना,येताना टेस्ट बंधनकारक !!

बीड – वाढते कोरोना रुग्ण पाहता बीड जिल्ह्यात उद्या म्हणजे 25 मार्च च्या रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हा संपूर्णपणे लॉक डाऊन असणार आहे .या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये,बांधकाम बंद राहतील .बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत .

काय बंद असेल वाचा …….!

बीड जिल्ह्यातील स्टेडियम,जिम,स्विमिंग पूल,उपहारगृह,हॉटेल,रेस्टॉरंट, बार,बंद राहणार आहेत .शाळा महाविद्यालय,प्रशिक्षण संस्था बंद असतील .सार्वजनिक,खाजगी वाहने,दुचाकी,चारचाकी वाहने बंद असतील .सर्व प्रकारची बांधकामे,चित्रपट गृहे,व्यायामशाळा,नाट्यगृह बंद असतील .मंगल कार्यालय,हॉल,स्वागत समारंभ बंद असतील .सर्व धार्मिक स्थळे,सार्वजनिक प्रार्थनास्थळ बंद असतील .खाजगी कार्यालये बंद असतील .दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगची कामे तीन व्यक्तींना करण्यास परवानगी असेल .

काय सुरू असेल वाचा ………..!

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील .किरकोळ विक्रेते यांनी सकाळी 7 ते 9 या वेळेत दुकानातून घरपोहच किराणा माल पुरवठा करतील .दूध विक्री सकाळी 10 पर्यंत सुरू राहील .भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 7 ते 10 या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील .हे किरकोळ विक्रेते सकाळी 7 ते 12 या काळात गल्लोगल्ली फिरून विक्री करतील .खाजगी दवाखाने मेडिकल सुरू राहतील .ऑनलाइन औषध वितरण दवाखान्याशी संलग्न असलेली दुकाने 24 तास सुरू ठेवता येतील .सर्व न्यायालये,राज्य केंद्र शासनाची कार्यालये 50 टक्के उपस्थिती मध्ये सुरू ठेवता येतील .

पोलीस पेट्रोल पंप,साई पेट्रोल पंप हे दोन पंप सुरू राहतील .येथे पोलीस,आरिजि व इतर शासकीय वाहने,अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी,घरगुती गॅस,पिण्याच्या पाण्याचे वितरण करणारी वाहने .दैनिक वर्तमानपत्र, नियतकालिके, डिजिटल प्रिंट मीडिया, शासकीय कार्यालये सुरू राहतील .अंत्यविधी साठो 20 लोकांना परवानगी असेल .स्वास्य धान्य दुकाने 12 पर्यंत सुरू राहतील .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click