पुणे – शिखर धवन,विराट कोहली,कृनाल पांड्या आणि के एल राहुल या चौघांच्या अर्धशतकी खेळीमुळे 318 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने इंग्लंडवर तब्बल 66 धावांनी विजय मिळवला .
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड ने क्षेत्ररक्षण स्वीकारले, भारताने सुरवातीला रोहित शर्मा ची विकेट दिल्यानंतर शिखर धवन आणि कप्तान विराट कोहलीने शतकी भागीदारी केल्यानंतर विराट बाद झाला,अवघ्या दोन धवांनी शतक हुकल्यानंतर शिखर च्या जागेवर आलेल्या के एल राहुल आणि कृनाल पांड्या यांनी अर्धशतक झळकावले .
भारताने पन्नास षटकात दिलेल्या 318 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड ने 135 धावांची सलामी भागीदारी केल्याने भारत मॅच हरतो की काय असे वाटले होते मात्र गोलंदाजांनी घेतलेल्या अप्रतिम मेहनतीमुळे इंग्लंड चा तब्बल 66 धावणी पराभव झाला .