मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानी स्फोटक प्रकरण सरकारच्या अंगाशी येत असल्याच दिसून येताच राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी केली आहे .पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर सिंग यांच्या अडचणी वाढल्या होत्या .

भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती,त्यानंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाला होता .त्यानंतर विरोधी पक्षाने सचिन वाझे यांच्यावर अटक करून निलंबित करण्याची मागणी केली होती,मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची पाठराखण केली होती .
दरम्यान सोळा दिवसानंतर सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली होती .वाढत दबाव आणि प्रकरणात राज्य सरकारची गेलेली अब्रू वाचवण्याचा एक प्रयन्त म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलात काही बदल्या केल्या आहेत ,त्यात परमवीर सिंग यांची बदली झाली आहे .
हेमंत नगराळे हे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे .परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता वाझे प्रकरणात त्यांच्यावर एन आय ए काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .