मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या दोन दिवसात लॉक डाऊन करायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली .
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानं धोका वाढला आहे. त्यामुळे काही भागांत प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘कोरोनाची लस अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही बाळगू नये. मनात कोणताही किंतु-परंतु आणू नका. लस घेण्यास पात्र ठरल्यानंतर निश्चिंतपणे लस घ्या. त्यासोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियमदेखील पाळा,’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.