बीड- बीड मतदारसंघातील अंबिका चौक ते करपरा नदी या सिमेंट रोडच्या कामासाठी बोगस वर्क डन, बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई येथील डी बी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.सदरील कंपनी ही बीड तालुक्यातील डॉ बाबू जोगदंड यांची आहे.ते विद्यमान आ संदिप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय आहेत.
बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांनी 25 जानेवारी रोजी एक आदेश काढला असून त्यामध्ये डी बी कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे म्हटले आहे.
डीबी कन्स्ट्रक्शन या कंपनीने एम एस आर डी सी कडून 2016 मध्ये काम घेतल्याचे,ते पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते.याबाबत तत्कालीन नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी तक्रार केल्यानंतर सदरील प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.