December 10, 2022

दिवाळीच्या नावाखाली पोलीस,महसूल,पुरवठा विभाग मालामाल !

दिवाळीच्या नावाखाली पोलीस,महसूल,पुरवठा विभाग मालामाल !

बीड- वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक ,चॅनेल,युट्युब चॅनेल यांच्या दिवाळी अंकाच्या नावाखाली बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महसूल,पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः पोलीस आणि पुरवठा विभागाने यामध्ये लाखोंची कमाई केल्याची चर्चा आहे.काही बीट अंमलदार पत्रकार देखील या माध्यमातून लखपती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे वर्तमानपत्र क्षेत्रावर मोठे संकट आले.मात्र यावर्षी सगळी कसर भरून काढण्यासाठी मोठं मोठ्या विभागीय वर्तमानपत्रांनी आपल्या बिट अमलदारांसह जिल्हा प्रतिनिधी यांना कोट्यावधी रुपयांचे टार्गेट दिले.


टार्गेट पूर्ण करण्यासाठी दसऱ्यापासूनच हे बिट अमलदार शासकीय कार्यालयात फिरतानाचे चित्र दिसून आले.ज्यांच्याकडे जिल्हा परिषद बिट आहे त्यांनी सीईओ,अतिरिक्त मुकाअ, डीएचओ, शिक्षणाधिकारी,बांधकाम,जल जीवन मिशन ,ग्रामीण पाणी पुरवठा या विभागात कार्ड वाटप केले.
ज्यांच्याकडे क्राईम बिट आहे त्यांनी एसपी कडे कार्ड दिले.हे कार्ड एलसीबी कडे वर्ग झाले अन तेथून ठराविक पत्रकार सोडून इतरांचे कार्ड शहर,ग्रामीण,पेठ बीड,शिवाजीनगर आणि ट्रॅफिक कडे वर्ग करण्यात आले.


महसूल विभागात एका उपजिल्हाधिकारी महोदयांनी दहा पाच जवळच्या मंडळींना बोलावून त्यांची दिवाळी दहा वीस हजारात गोड केली.कहर म्हणजे पुरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशन दुकानदार आणि शिवभोजन केंद्र चालकांकडून प्रत्येकी पाच हजाराची दिवाळी जमा केली.प्रत्यक्षात ठराविक वर्तमानपत्र आणि पत्रकार यांनाच बिदागी अथवा जाहिरातीचे वाटप केले.लाख दोन लाख रुपयांच्या जाहिराती वाटण्यासाठी पुरवठा विभागाने पाच पन्नास लाखांची बिदागी गोळा केली.म्हणजेच दिवाळी अंकाच्या नावाखाली पुरवठा विभागाने स्वतःची दिवाळी साजरी केली.


पोलीस प्रशासनात देखील असाच प्रकार झाल्याचे कानावर आले.साधा ट्रॅफिक चा हवालदार असो की पीएसआय अथवा डीबी पथकातील कर्मचारी यांच्याकडून किमान एक हजार ते जास्तीत जास्त पाच दहा हजार गोळा केले गेले.हे गोळा केलेले पैसे चार दोन जणांना ठराविक वाटले अन बाकीचे अधिकाऱ्यांनीच ठेवून घेतले.एलसीबी कडे जवळपास 170 ते 200 कार्ड आले होते,या सगळ्यांना खुश करण्यासाठी एलसीबी ने कार्डचे वाटप केले.
जिल्हा परिषद मध्ये देखील आरोग्य विभाग असो की जल जीवन मिशन अथवा ग्रामीण पाणी पुरवठा या विभागाने काही काही वर्तमानपत्रांना दोन दोन लाखाच्या जाहिराती दिल्याचे दाखवले तर बिट अंमलदार यांनादेखील पाकीट दिली गेली.ज्या अधिकाऱ्यांनी दिवाळी दिली नाही त्यांच्या विरोधात काहीतरी उकरून काढण्याचे प्रकार देखील ऐकण्यात आले आहेत.

एकंदरच काय तर पत्रकार आणि वर्तमानपत्र यांच्या नावाखाली पोलीस,महसूल,पुरवठा, कृषी,जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोरात कलेक्शन करत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली हे नक्की.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click