December 10, 2022

बीडच्या डाकोरे यांची अधीक्षक अभियंता पदी पदोन्नती !

बीडच्या डाकोरे यांची अधीक्षक अभियंता पदी पदोन्नती !

बीड- येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी एच डाकोरे यांची अधीक्षक अभियंता म्हणून अकोला येथे पदोन्नती झाली आहे.यांच्यासह दहा कार्यकारी अभियंता यांच्या पदोन्नती चे आदेश शासनाने नुकतेच काढले आहेत.

चार पाच महिन्यांपूर्वी बीडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालेले आणि दोन महिन्यांपूर्वी रजेवर गेलेले डी एच डाकोरे यांची अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती झाली आहे.

बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणावर महाघोटाळा झाल्यानंतर डाकोरे हे रजेवर निघून गेले होते.दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने नुकतेच अधीक्षक अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती चे आदेश काढले आहेत.

यामध्ये डी एच डाकोरे,एस एस गव्हाणकर,ए जे सिंह,पी डी भामरे,एम व्ही पाटील,बी के वानखेडे,व्ही एस आवटे,एस बी नरवाडे,एस एम कदम,एम जी गिरगावकर यांची पदोन्नती झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click