December 10, 2022

कलेक्शन जोरात म्हणून दिवाळी जोरात !!

कलेक्शन जोरात म्हणून दिवाळी जोरात !!

बीड- कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर ची पहिली दिवाळी जगभरात उत्साहात आणि आनंदात साजरी झाली तशी ती बीड जिल्ह्यात देखील झाली मात्र दिवाळी अंकाला जाहिरात देण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी जोरदार कलेक्शन करत लाखो रुपये छापले आणि हजाराच्या जाहिराती देऊन काही ठराविक पत्रकारांना उपक्रम केले त्यामुळे या दिवाळीने अधिकाऱ्यांना लक्ष्मीचे वरदान मिळाले अशी चर्चा सुरू आहे

कोणतंही वर्तमानपत्र हे वर्षभरात दिवाळी अंक आणि वर्धापन दिन साजरा करतात यासाठी त्या त्या तालुका पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येक पत्रकारावर जाहिराती गोळा करण्याची जिम्मेदारी दिली जाते अलीकडच्या काळात वर्तमानपत्र असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया हा धंदा झालाय आणि त्यामुळे दिवाळी अंकाचे टार्गेट दिले जाते

या दिवाळी अंकाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मग तेथे विभाग सांभाळणारे बीट अंमलदार म्हणजेच पत्रकार कामाला लागतात गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची महामारी असल्यामुळे बहुतांश दैनिक आणि इतर वृत्तपत्रांची दिवाळी अंक प्रकाशित झाले नाहीत आणि झाले असले तरी ते मर्यादित स्वरूपात होते त्यामुळे दोन वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विभागीय दैनिकांनी कोट्यावधी रुपयांचे टारगेट जिल्हा पातळीवर दिले

हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी बीड जिल्ह्यातील त्या त्या बीट अंमलदारांनी आपल्या आपल्या विभागातील ओएस पासून ते प्रमुखापर्यंत प्रत्येकाची उंबरे शिजवले अक्षरशः एका एका कार्यालयात दीडशे ते दोनशे दिवाळी अंकाचे रेट कार्ड पोहोच झाले

कितीही पैसे खाणारा अधिकारी असला तरी खाल्लेल्या पैशातून देखील थोडाफार वाटायला दानत ही लागतेच त्यामुळे पुरवठा विभाग असो पोलीस प्रशासन असो कृषी विभागासो की जिल्हा परिषद प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी एक अलिखित फर्मान काढले आणि लाखो रुपयांचे कलेक्शन पत्रकारांच्या नावावर केले गेले

हे कलेक्शन करताना सगळ्यात जास्त कलेक्शन हे पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासनामध्ये झाले त्यानंतर काही ठराविक बीट अंमलदार पत्रकारांवर खाते प्रमुखांनी उपकार केल्याप्रमाणे दहा पंधरा वीस हजाराचे पाकीट पोहोच केले आणि बाकीचे पैसे स्वतःच्या घरची दिवाळी साजरी करण्यासाठी वापरले आता कोणी किती पैसे दिले आणि किती कलेक्शन झाले याची आकडे डिपार्टमेंट नुसार आमच्याकडे आहेत ते लवकरच आम्ही सर्वांसमोर मांडणार आहोत

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click