December 10, 2022

बोचऱ्या थंडीमुळे महाराष्ट्र गारठला !

बोचऱ्या थंडीमुळे महाराष्ट्र गारठला !

बीड- परतीच्या जोरदार पावसामुळे लांबलेला थंडीचा सिझन आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे.गेल्या दोन तीन दिवसापासून बीडसह मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा कमालीचा उतरला आहे.थंडीमुळे अनेक शहरावर सकाळी सकाळी धुक्याची चादर पसरल्याचे दृश्य दिसते आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीमुळे धुक्याची चादर पसरलीय. कोल्हापूर, सातारासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र थंडीने कुडकुडलाय. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील पारा घसरलाय. थंडीचा कडाका वाढल्यानं लोकांनी शेकोटीचा आधार घेतलाय.
फक्त मुंबई आणि जळगावच नव्हे तर औरंगाबाद आणि पुण्यातही थंडीने लोकं कुडकुडली आहेत. औरंगाबादमध्ये तापमान 9.2 तर पुण्यात 9.7 डिग्री सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.


नाशिकमध्ये तापमानात सलग पाचव्या दिवशी तापमानात घट झालीय. रविवारी नाशिकमध्ये 9.8 इतकं तापमान नाशिकमध्ये नोंदवलं गेलं. हे आतापर्यंतच निच्चांकी तापमान आहे. दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये 10.4 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर
गेल्या पाच दिवसात नाशिकमधील पारा 5.4 डिग्री
नागपूर – 17,मुंबई – 23,पुणे – 17,औरंगाबाद – 16,बीड- 14,सातारा – 17,कोल्हापूर – 17,सोलापूर – 18,चंद्रपूर – 18,ठाणे- 22,नवी मुंबई – 21,रायगड – 18,नाशिक – 16,जळगाव – 17,धुळे – 19,अहमदनगर -12


दुपारपासूनच गारठा जाणवू लागल्याने नागरिकांनी दुपारपासूनच स्वेटर, कोनटोपी घालून राहणे पसंत केले. सायंकाळीच शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासह विदर्भातील काही शहरे रविवारी गारठली होती. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर भारतातून गार शीतलहरी सक्रिय झाल्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click