December 10, 2022

रब्बी ज्वारीचा पेरा घटला !

रब्बी ज्वारीचा पेरा घटला !

बीड- परतीचा लांबलेला पाऊस,शेतात असलेले अतिरिक्त पाणी,वाफसा न झाल्याने पेरणीस झालेला उशीर यामुळे यंदा राज्यातील ज्वारीचा पेरा कमालीचा घटण्याची चिन्हे आहेत.आतापर्यंत केवळ 38 टक्के पेरा झाला असून सर्वाधिक ज्वारी सोलापूर आणि बीड जिल्ह्यात पेरणी झाली आहे.

राज्यात ज्वारीचे सरासरी १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर क्षेत्र आहे. मुळात राज्यात रब्बीत ज्वारी हे प्रमुख पीक गणले जात होते. मात्र अलीकडच्या पाच वर्षांत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. क्षेत्र घटत असल्याने सरासरी क्षेत्रातही कमी केले जात आहे. २००० मध्ये रब्बीत ज्वारीची ३१ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षी केवळ १२ लाख ४४ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

यंदा परतीचा पावसाचा रब्बी हंगामावर मोठा गंभीर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ 6 लाख हेक्टर वर आतापर्यंत ज्वारी पेरणी झाली आहे.तज्ज्ञांच्या मते यंदा वीस दिवस ते महिनाभर रब्बीच्या पेरण्या उशिराने सुरू झाल्या. ज्वारीचे क्षेत्र असलेल्या नगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांत ऑगस्टपासून (गोकुळ अष्टमी) ज्वारी पेरायला सुरू होते.

ऑक्टोबर अखेरपर्यंत ज्वारी पेरून होते. त्यामुळे ज्वारी पेरणीचा कालावधी आता संपल्यात जमा आहे. मात्र आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३८ टक्के पेरणी झाली. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी सोलापूर, नगर, सातारा, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पेरणी झाली आहे. आतापर्यंतचा पेरणीचा वेग पाहता यंदा गतवर्षीपेक्षा क्षेत्रात घट होण्याचा अंदाज दिसत आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा जिल्ह्यांत ज्वारीचे पीक घेतले जात नसल्याने या जिल्ह्यांत अजिबात ज्वारी पेरली गेली नाही. तर नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्‍ह्यांत ज्वारीचे बोटावर मोजण्याएवढे क्षेत्र असते, मात्र अजून तेथे अल्प पेरणी झाली.

बाजारात ज्वारीला मागणी बऱ्यापैकी आहे. मात्र भुसार माला गणल्या जाणाऱ्या ज्वारीला बाजारात पुरेसा दर मिळत नाही. नगर येथील बाजार समितीत ज्वारीची सर्वाधिक आवक होत असते. मात्र आतापर्यंतचा दर पाहता तीन हजारांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. सरासरी दर दोन हजारांच्या जवळच असते. खते, बियाणे, मजुरीचे वाढत दर पाहत ज्वारीचे पीक परवडत नसल्याने ज्वारीकडील शेतकऱ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत ज्वारीची पेरणी (हेक्टरमध्ये)

नाशिक -३७७, धुळे -१५११, नंदुरबार – ९९९, जळगाव -१३३०१, नगर -९६३८६, पुणे – ४६३४७, सोलापूर -१,३०,९८०, सातारा -७११४१, सांगली -१०१८०८, कोल्हापूर – ४९४, औरंगाबाद – ६२०७, जालना -३५४०२, बीड – ८३७३०, लातूर – ५७४९, उस्मानाबाद – ३१४४०, नांदेड -६०७७, परभणी- ३२५०८, हिंगोली -२५३१, बुलडाणा- २०, अकोला -२, अमरावती -०, यवतमाळ -४, वर्धा -२४५, नागपूर -०, भंडारा -०, गोंदिया -२, चंद्रपूर – ५५, गडचिरोली- २०. (१४ नोव्हेंबरपर्यंतचा अहवाल, स्रोत ः कृषी विभाग)

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click