December 10, 2022

रोटरीच्या मूळव्याध शिबीराचा शुभारंभ !

रोटरीच्या मूळव्याध शिबीराचा शुभारंभ !

बीड- रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने बीड शहरात मागील 20 वर्षापासून घेण्यात येणाऱ्या पाईल्स शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी हे शिबीर दि 18,19 व 20 नोव्हेंबर असे तीन दिवस आदित्य मेडिकल कॉलेज येथे आयोजित करण्यात आले आहे.पहिल्याच दिवशी 16 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.


या मूळव्याध शिबाराच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे अहमदाबादचे प्रसिद्ध शल्यविशारद डॉ देवेंद्र शहा आदित्य एज्युकेशन ट्रस्टचे अधक्ष्य सुभाष सारडा होते तर या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ उद्योजक सत्यनारायण लाहोटी ,रोटरी क्लब अधक्ष्य कल्याण कुलकर्णी सचिव प्रा सुनील जोशी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जेथलीय शिबीर प्रमुख सूरज लाहोटी बीडचे मूळव्याध तज्ञ डॉक्टर रमेश घोडके यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित लाभार्थी रुग्ण आणि रोटरीयन तसेच आदित्य मेडिकल कॉलेज मधील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थिती शिबिराचे उदघाटन झाले

कार्यक्रमाच्या सुरवातीला क्लबचे अधक्ष्य यांनी आपल्या प्रास्ताविकात रोटरीच्या मार्फत वर्षभर घेत आलेल्या सामाजिक प्रोजेक्त बद्दलची माहिती दिली
या प्रसंगी एस बी आय चे क्षेत्रीय महाप्रबंधक
भरत पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणले की रोटरी क्लबचा हा मूळव्याध कॅम्प एक आदर्श सामाजिक आरोग्य परंपरा निर्माण करणारा आहे
मूळव्याध सारख्या असाध्य आजाराचे मोफत निराकरण मागील वीस वर्षा पासून ह्या शिबिराच्या माध्यमातून करते आहे या शिबिराचे आयोजन बघून मी भारावून गेलो रोटरी क्लब चा हा आदर्श इतर सामाजिक संघटने नी पण घेतला पाहिजे
एस बी आय चा एक अधिकारी म्हणून
माझी रोटरी क्लबला विनंती आहे की आगामी काळात रोटरीने समाजातील गरीब विद्यार्थ्यांना एस बी आय चे शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा
रोटरीच्या शिफारशीने कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही पण प्राधान्याने कर्ज देऊ म्हणजे गरीब विद्यार्थी शैक्षणिक कर्जा पासून वंचित राहणार नाही व त्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही
प्रमुख पाहुणे डॉ देवेंद्र शहा म्हणले की या शिबिरातील ज्या रुग्णांचे ऑपरेशन इथे करणे शक्य होणार नाही
त्यांनी अहमदाबाद येथे येऊन मोफत ऑपरेशन करून घ्यावे रोटरी क्लबच्या या सामाजिक आरोग्य परंपरे सोबत
मी व माझी टीम कायम सोबत असेल आगामी काळात ही आम्ही इथे येथे येऊन मोफत उपचार करू
या शिबिराच्या यशस्वीते साठी आदित्य मेडिकल कॉलेज यांचे मोफत हॉस्पिटल उपलब्ध करून दिले तर तिरुमला कुटे ग्रुप आणि राजर्षि शहु बँके यांचे आर्थिक सहकार्य लाभले तर शिबिराच्या यशस्वी आयोजनात रो प्रमोद निनाळ रो राम मोटवाणी तसेच रोटरी क्लब मधील सर्व सदस्यांनी हातभार लावला या उदघाटन समारंभाचे खुमासदार सूत्रसंचालन रो राजेंद्र मुनोत यांनी केले तर आभार सचिव प्रा सुनील जोशी यांनी मानले

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click