December 10, 2022

घरकुलाचे स्वप्न साकार होणार – योगेश क्षीरसागर !

घरकुलाचे स्वप्न साकार होणार – योगेश क्षीरसागर !

बीड – शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने शहरातील तब्बल 450 कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळणे अशक्य होते,मात्र माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने या लोकांचे घरकुळाचे स्वप्न साकार होणार आहे.या अतिक्रमित नागरिकांना आहे त्या जागेचा पिटीआर मिळणार आहे.

बीड शहरातील अनेक लाभार्थ्यांना केवळ तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाचा लाभ घेता येत नव्हता ही बाब निदर्शनास आल्या नंतर युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ज्यांच्याकडे पिटीआर आहे त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा असा आदेश मंजूर करून घेतला
यानंतर डॉ योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तांत्रिक बाबीची पूर्तता करून अर्जदार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी केली त्यानुसार पिटीआर वर नाव नोंदणी असणाऱ्याना घरकुल देण्याचा मार्ग मोकळा झाला असून असे ४०० ते ४५० लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे,डॉ योगेश क्षीरसागर यांच्यामुळे आता या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार आहे

नगर परिषद बीड प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डीपीआर-१०९-९१०-९८९-२०० या चार डीपीआर मधिल जवळपास ४००-४५० मंजुर असलेल्या लाभार्थ्यंकडे जागेचा फक्त पिटीआर होता,मात्र काही तांत्रिक बाबीमुळे या लाभार्थ्यना घरकुलाचा लाभ देता येत नव्हता परंतु गेले २ वर्षा पासुन माजीमंत्री जयदत्त क्षिरसागर,माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षिरसागर आणि युवानेते डॉ योगेश क्षिरसागर हे सातत्याने प्रयत्न करत होते

याबाबत मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान मुख्याधिकारी यांनी सदरिल लाभार्थ्यना लाभ देन्याचे संगीतले त्यामुळे बीड शहरतील पिटीआर वरील सर्व लाभार्थ्यना घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click