December 10, 2022

लग्नानंतर अवघ्या 21 दिवसात संपवले जीवन !

लग्नानंतर अवघ्या 21 दिवसात संपवले जीवन !

गेवराई- लग्न झालं,सात फेरे घेतले,सुखी संसाराची स्वप्न पाहिली अन अवघ्या 21 व्या दिवशीच नवरदेवाने आपली जीवनयात्रा संपवल्याची भयंकर घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे घडली.या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नववधूला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तीन आठवड्यापुर्वी विवाह झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.सदरील घटना ही सोमवार रोजी रात्री घडली असून यामध्ये घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असुन नातेवाईकांनी गेवराईचा पोलीस ठाण्यात ठिय्या देखील दिला होता. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे सदरील मृत तरुणाच्या मृतदेहावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून आता प्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र यासंबंधी कोणता गुन्हा दाखल केला जातो हे पाहणे गरजेचे आहे.

पांडुरंग चव्हाण याचा २१ दिवसापूर्वी विवाह झाला होता. मात्र रात्री अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पांडुरंग यांच्या मृत्यूला त्याची पत्नी कारणीभूत असल्याने नातेवाईकांनी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. आता पांडुरंगचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच निष्पन्न होईल. तोपर्यंत त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्नानंतर अवघ्या २१ दिवसात पांडुरंगचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होते आहे. आता या प्रकरणी घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांना आहे. नेमकं प्रकरण काय आहे? हे पांडुरंगच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात पांडुरंगच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click